शीतल टाईम्स //पत्रकारांनी एखाद्या घटनेची एकतर्फी बाजू न मांडता दुसरी बाजुही समाजापुढे आणली पाहिजे - सुनिल मुथा शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

पत्रकारांनी एखाद्या घटनेची  एकतर्फी बाजू न मांडता दुसरी बाजुही समाजापुढे आणली पाहिजे - सुनिल मुथा

शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी


शीतल टाइम्स प्रतिनिधी

श्रीरामपूरः- पत्रकारिता करताना पत्रकारांनी कोणताही पूर्वग्रहदुषितपणा न राखता एखाद्या घटनेचे वृत्तांकन केले पाहिजे. तसेच एखाद्या प्रकरणी एक बाजू मांडताना दुसरी बाजुही समाजासमोर आणली पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर आरोप होत असतील तर त्या व्यक्तीला आपली बाजु मांडण्याचीही संधी दिली पाहिजे जेणेकरुन त्या व्यक्तीच्या सामाजिक प्रतिमेची हानी होणार नाही असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य सुनिल मुथा यांनी केले.

राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सत्काराचे कार्यक्रमात बोलताना श्री.मुथा म्हणाले की, पत्रकारिता ही निरपेक्ष असली पाहिजे. एखाद्या घटनेबाबत त्यातल्या त्यात ती सामाजिकतेशी निगडीत असेल तर त्या घटनेच्या दोन्ही बाजू समाजापुढे आणल्या पहिजेत. एकतर्फी बातमी दिल्यास एखाद्या चांगले सामाजिक काम करणाराचीही प्रतिमा डागाळते. अशावेळी ज्याच्यावर आरोप झाले आहेत त्या व्यक्तीलाही आपली बाजू मांडण्याची वा त्या घटनेसंदर्भात खुलासा देण्याची संधी दिली पाहिजे.एखादी व्यक्ती गतकाळातील पार्श्वभूमीला तिलांजली देत आपल्यात बदल घडवित असेल तर त्याला सुधारणा करण्याची संधी समाज व पत्रकाराने नाकारणे योग्य ठरत नाही, असे श्री.मुथा म्हणाले.

सागर बेग हे धर्मकार्यासाठी अपप्रवृत्ती व समाजकंटकांना अंगावर घेतात हा गुन्हा ठरत नाही. अखेर समाजाच्या हितरक्षणासाठी कोणालातरी अपप्रवृत्तीशी भिडावेच लागते. माझ्यावरही असे भिडण्याचे प्रसंग भूतकाळात आले. अनेक प्रकरणी माझ्यावर गुन्हेही दाखल झाले. तथापि आजही लोक त्यांचे गाऱ्हाणे, समस्या घेवून आपल्याकडे येतात याकडे श्री.मुथा यांनी लक्ष वेधले. 

सागर बेग यानी नुकत्याच घडलेल्या प्रकरणाचा दाखला देताना सांगीतले की, सदरप्रकरणी आपली जाणिवपूर्वक बदनामी केली जात आहे. आपल्यावर आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्यावर आरोप केल्यास आपली तक्रार असणार नाही. मात्र आपली जात, आईवडील यांचेबाबत आक्षेपार्ह बोलले जात असेल तर ते कसे सहन करावे असा सवाल त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत पन्नास हजार मतदारांनी आपल्याला पाठबळ देवून एकाअर्थाने आपल्यावर विश्वासच दर्शविला आहे. आपल्या वाटचालित पत्रकारांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा श्री.बेग यांनी व्यक्त केली. सदरप्रसंगी पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव