शीतल टाईम्स // वेदोत्सवमध्ये प्रथम आलेल्या वेदाभ्यासी महेश दायमाचे बेलापुरात उद्या स्वागत शीतल टाईम्स प्रतिनिधी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
वेदोत्सवमध्ये प्रथम आलेल्या वेदाभ्यासी महेश दायमाचे बेलापुरात उद्या स्वागत
शीतल टाईम्स प्रतिनिधी
बेलापूर (प्रतिनिधी)-महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान बेलापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या वेदोत्सव परिक्षेत दधिमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत गुरुकुलातील तसेच बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रीका पटकावली होती.
श्रीराम जन्म भूमीचे गोविंददेवगिरी महाराज तथा किशोरजी व्यास महाराज यांच्या हस्ते महेश दायमा यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्या यशानंतर महेश दायमा हे उद्या मंगळवार दि. १३ मे रोजी बेलापूर येथे आपल्या मुळ गावी येत असून त्यांच्या यशाबद्दल भव्य अशी मिरवणूक काढून सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
उद्या मंगळवारी दुपारी ४ वाजता होणाऱ्या मिरवणूक व सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेलापूर ग्रमस्थ, गावकरी मंडळ, सकल राजस्थानी समाजाने केले आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा