शीतल टाइम्स प्रतिनिधी महेश दायमा याने वेदोत्सव परिक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद- महेश व्यास

 

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी

महेश दायमा याने वेदोत्सव परिक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद- महेश व्यास


               बेलापूरः (प्रतिनिधी)- महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान यांचे वतीने घेण्यात आलेल्या वेदोत्सव परिक्षेत सुवर्णमुद्रिका प्राप्त करुन महेश दायमा याने दैदिप्यमान यश मिळविले आहे. देशातील चाळीस गुरुकुल अंतर्गतच्या या खडतर  परिक्षेत यश मिळविणे खरोखरच कौतुकास्पद आणि आभिमानास्पद असल्याचे मत आचार्य महेश व्यास यांनी केले.                               

महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान आयोजित वेदोत्सव परिक्षेत दधिमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत मठातील विद्यार्थी तसेच बेलापूर येथील पञकार दिलिप दायमा व सौ मिना दायमा यांचे चिरंजीव तसेच महेश दायमा याने प्रथम क्रमांक मिळवून रामजन्मभूमीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेवगिरीजी यांचे हस्ते सुवर्णमुद्रिका प्राप्त केली. याबद्दल बेलापूर ग्रामस्थ, छन्याती समाज व गावकरी मंडळाचेवतीने त्याचे स्वागत, मिरवणुक आणि सत्कार करण्यात आला.                              

महेश दायमा याचे बेलापूर येथे आगमन झाल्यावर त्याची बेलापूर पोलिस औट पोस्ट, छ.शिवाजी पुतळा, शनिमंदिर,बालाजी मंदिर ते नवशा हनुमान मंदिर अशी सवाद्य मिरवणुक काढाण्यात आली. त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला. यावेळी आचार्य महेश व्यास, भास्कर खंडागळे, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, भरत साळुंके, चंद्रकांत नाईक, नंदकुमार गोरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. महेश दायमा याने सत्काराबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद देत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पणजी टाक शिवनारायण  दायमा शिवप्रहारचे चंद्रशेखर आगे योगेश दायमा असलम बिनसाद संजय शिंदे अरविंद साळवी रमेश दायमा सुभाष अमोलिक प्रसाद खराद नंदकिशोर डागा प्रविण बाठीया श्रीवल्लभ दायमा कमलेश दायमा अँड विजय साळूंके राजेंद्र श्रीगोड प्रशांत लड्डा शांतीलाल हिरण मारोतराव राशिनकर प्रकाश दायमा कुमार नावंदर नंदकिशोर दायमा गोपी दाणी महेबुब शेख अजीज शेख श्रीकांत व्यास दिपक वैष्णव हरिभाऊ सिकची. ग्रामस्थ, भाविक, विविध संस्थांचे पदाधिकारी, छन्याती समाज बांधव, महिला आदि मोठ्या संख्येने उपस्थित होतेउपस्थित होते.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव