शीतल टाईम्स // बेलापूर गावकरी मंडळाच्या वतिने शनैश्वर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा हगामा शीतल टाईम्स प्रतिनिधी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर गावकरी मंडळाच्या वतिने शनैश्वर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा हगामा
शीतल टाईम्स प्रतिनिधी
बेलापूरः येथील शनैश्वर यात्रेनिमित्त गावकरी मंडळाचेवतीने मंगळवार २७ मे रोजी कुस्त्यांचा हगामा आयोजित करण्यात आला आहे. सदर कुस्त्यांच्या हगाम्यात कोल्हापूर, सोलापूर, अहिल्या नगर, गंगापूर, नेवासा, कोपरगाव आदी ठिकाणासह विविध जिल्ह्यातील नामांकित कुस्तीपटू सहभागी होणार असल्याची माहिती जि.परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.
शनैश्वर याञेच्या निमित्ताने गावकरी मंडळाने गेल्या वर्षापासून खंडीत झालेली कुस्त्याच्या हगाम्याची परंपरा पूर्ववत सुरु केली. प्रथेनुसार सोमवार (ता.२६) रोजी पहाटे ४वा. शनैश्वर महाराजांना पारंपारिक अभिषेक संपन्न होईल. त्यानंतर मंगळवार (ता.२७) रोजी दुपारी ४ वा. जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मैदानावर कुस्त्यांचा हगामा आयोजित करण्यात आला आहे. हगाम्या मध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांना योग्य ती बिदागी देण्यात येणार आहे. कुस्त्यांच्या हगाम्याच्या नियोजनाबाबत गावकरी मंडळाची शरद नवले व अभिषेक खंडागळे यांचे उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी भास्कर खंडागळे, विष्णुपंत डावरे, देविदास देसाई, दिलिप दायमा, सुभाष अमोलिक, बाळासाहेब दाणी, रावसाहेब अमोलिक, प्रविण बाठीया, बंटी शेलार, राज गुडे, महेश कु-हे, सुनील शहाणे सर, भाऊसाहेब तेलोरे, गणेश बंगाळ, गोपी दाणी, अजीज शेख, शाहरुख शेख, रमेश काळे, समीर जहागीरदार, सद्दाम आतार, शाम गायकवाड, शफीक बागवान, अली शेख, जाकीर शेख, शशिकांत तेलोरे, प्रशांत मुंडलिक, अँड. मयुर साळुंके, दिपक गायकवाड, प्रविण मांजरे, आदित्य जाधव, अक्षय कु-हे, रामकृष्ण आहिरे, पोपट पवार, विनायक जगताप, संजय शिंदे आदि उपस्थित होते.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा