शीतल टाईम्स //- श्रीरामपूर पोलिसांची यशस्वी कारवाई – ATM चोरीचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद!
शीतल टाइम्स प्रतिनिधी
श्रीरामपूर पोलिसांची यशस्वी कारवाई – ATM चोरीचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद!
श्रीरामपूर (शीतल टाईम्स प्रतिनिधी) – शहरातील कोल्हार चौकात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या एटीएम फोडण्याच्या घटना आता उलगडू लागल्या असून, श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एक मोठी टोळी जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे.
दिनांक 06 जून 2025 रोजी सधीर प्रभाकर धालपे यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांच्या एटीएम मशीनला अज्ञात चोरट्यांनी कारमधून येत मशीन बाहेर ढकलून चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 14 जुलै रोजी पुन्हा एकदा गॅस कटरच्या सहाय्याने त्याच एटीएम मशीनला फोडण्याचा प्रयत्न झाला. या दोन्ही घटनांमध्ये मारुती 800 या निळ्या रंगाच्या कारचा वापर झाल्याचे सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक विश्लेषणावरून स्पष्ट झाले.
गुप्त माहितीमुळे मिळाले यश
24 जुलै रोजी संध्याकाळी बेलापूर बाजारतळ परिसरात संशयास्पदपणे उभी असलेली मारुती 800 कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी चौकशी केली असता, कारमधील व्यक्तींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करत बेलापूरहून पढेगावपर्यंत पाठलाग केला. अखेर कार पलटी होऊन थांबली व पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले आरोपी पुढीलप्रमाणे:
- दिपक गोपाल देवांगण (वय 23, रा. म्हाडा वसाहत, श्रीरामपूर)
- सम्यक विजय मुगदिया (वय 22, रा. दत्तनगर, श्रीरामपूर)
- विधी संघर्षीत बालक विराज राजेश कंडारे (वय 16, रा. वार्ड क्र. 6, श्रीरामपूर)
चोरीसाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले:
कारमधून काळ्या रंगाचे तीन जॅकेट्स, चेहरा झाकण्यासाठी मास्क, लोखंडी कटावणी, पिस्टलसदृश लायटर, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, आणि बॅग असा सविस्तर साहित्य सापडले.
अपघातात जखमी झालेल्या तिन्ही आरोपींना उपचारासाठी श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
ही कारवाई झाली या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली:
- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे
- अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे
- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे
- पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकात सपोनि गणेश जाधव, पो.नि. सुधीर हापसे, बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भारत तमनर, पंकज सानप, रविंद्र अभंग, नंदकिशोर लोखंडे, व होमगार्ड महेश थोरात यांनी ही धाडसी कारवाई पार पाडली.
शहरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही धक्कादायक गुन्हेगारी टोळी जेरबंद करणे ही महत्त्वाची कामगिरी असून, श्रीरामपूर पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
— शीतल टाईम्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा