शीतल टाईम्स //- श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भव्य सांगता

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी



श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भव्य सांगता

बेलापूर (प्रतिनिधी) :


बेलापूर बुद्रुक येथील संत सावता महाराज मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता बुधवार, दिनांक २३ जुलै रोजी होणार आहे. या सांगता सोहळ्यात ह.भ.प. अनिल महाराज महांकाळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही पारायण मालिका संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार, दिनांक १६ जुलैपासून प्रारंभ झाली होती. सात दिवस चाललेल्या या अध्यात्मिक सप्ताहात विविध किर्तनकारांच्या माध्यमातून भाविकांना ज्ञान, भक्ती आणि हरिपाठाचा आनंद अनुभवायला मिळाला.

या सप्ताहात ह.भ.प. मयूर महाराज बाजारे, डॉ. शुभम महाराज कांडेकर, विजय महाराज कोहिले, कृष्णा महाराज शिरसाठ, जीवराम महाराज कापंडेकर, मोहन महाराज बेलापूरकर व वीर महाराज यांनी कीर्तनसेवा केली.

पारायण सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, त्यानंतर श्री ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन असा दिनक्रम होता. सायंकाळच्या हरिपाठाचे नेतृत्व हरिहर महिला भजनी मंडळ, सावता महाराज भजनी मंडळ, गोखलेवाडी कुर्हे वस्ती भजनी मंडळ, तसेच बबन महाराज अनाप यांनी केले.

गायन सेवा संजय महाराज शिरसाठ, रामचंद्र सोनवणे, मधुकर पुजारी, मयूर महाराज कुर्हे, बळी तात्या वाकडे आणि कृष्णा महाराज शिंदे यांनी बजावली. हार्मोनियमवर अरुण कुर्हे, बन्सी महाराज मुंगसे, दत्तू जाधव, बापू अनाप, जिजाबाई शिंदे, शाम मेहेत्रे तर मृदंगसेवा विजय महाराज चौधरी, सुधीर महाराज कुर्हे, मयूर बाजारे, भास्कर कुर्हे, कैलास खर्डे, साठे मामा, शिवा मिसाळ व आदित्य सूर्यवंशी यांनी केली.

या सप्ताहाच्या यजमानपदाची सेवा राजेंद्र टेकाळे (कुर्हे वस्ती), गोखलेवाडी, दुधाळ वस्ती, मेहेत्रे परिवार (बेलापूर), श्री रघुनाथ एकनाथ जाधव, श्री गजानन दगडू जाधव, बाळासाहेब जाधव, माळी परिवार व दादासाहेब कुर्हे यांनी स्वीकारली.

या भक्तिभावपूर्ण कार्यक्रमासाठी बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द, नरसाळी, आंबी, केसापूर, चांदेगाव, उक्कलगाव, फत्याबाद, उंबरगाव, वळदगाव, कोर्हे वस्ती, पटेलवाडी, रामगड, लाडगाव, ऐनतपूर, सुभाषवाडी, मातापूर, कान्हेगाव, ब्राह्मणगाव, करजगाव, कनगर आदी पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

– शीतल टाईम्स




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव