शीतल टाईम्स //- विजेचा धक्का बसूनही वाचलेले वायरमन अनिल दोंड यांचा सत्कार बेलापूर (प्रतिनिधी - शीतल टाईम्स )
शीतल टाइम्स प्रतिनिधी
विजेचा धक्का बसूनही वाचलेले वायरमन अनिल दोंड यांचा सत्कार
बेलापूर (प्रतिनिधी - शीतल टाईम्स )
"देव तारी त्याला कोण मारी?" या मराठी म्हणीची प्रचिती महावितरणचे वायरमन अनिल दोंड यांना प्रत्यक्ष अनुभवावी लागली. वीज खांबावर काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसूनही त्यांचे प्राण वाचले आणि आज ते पुन्हा कामावर हजर झाले आहेत.
अनिल दोंड हे बेलापूर, ऐनतपूर, वळदगाव, उंबरगाव परिसरात मरावीज कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी उंबरगाव येथील वीज वितरण डीपीवर जंक कट झाला होता. वीज प्रवाह खंडित करून दोंड खांबावर चढले आणि दुरुस्ती करत असताना अचानक वीज प्रवाहित झाली. त्यांना तीव्र धक्का बसून ते खाली कोसळले, परंतु त्यांच्या पायाचा अंश डीपीच्या लोखंडी भागात अडकल्याने ते हवेत लटकले.
खाली उभे असलेले शेतकरी घाबरून गेले, कोणालाही त्यांना वर जाऊन खाली आणायची हिंमत झाली नाही. तत्काळ त्यांच्या मुलाला व मरावीज कंपनीचे अधिकारी चव्हाण व वाणी यांना संपर्क साधण्यात आला. लोक जमा होईपर्यंत दोंड बेशुद्ध अवस्थेत लटकत होते. त्यानंतर त्यांना खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ११.३० च्या सुमारास ते शुद्धीवर आले. डॉक्टरांनीही हा जीव वाचल्याचा चमत्कारच असल्याचे सांगितले.
काही दिवसांच्या उपचारानंतर दोंड यांनी पुन्हा कामावर रुजू होत आज पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी बेलापूरच्या शिवशंकर मळा येथील श्री महाकाल कोळेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी ते म्हणाले, "माझा जीव वाचला तो महादेवाच्या कृपेनेच. चांगल्या कामाची पुण्याई उपयोगी आली."
या धाडसी अनुभवानंतर अनिल दोंड यांचा टोपी, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, सचिन शेटे व संकेत उंडे उपस्थित होते.
---
📷 छायाचित्रात: वायरमन अनिल दोंड यांचा सत्कार करताना ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, सचिन शेटे आणि संकेत उंडे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा