शीतल टाईम्स //- चारी क्रमांक ३२ व ३३ वर अतिक्रमण; पाणीपुरवठा बंद; शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
शीतल टाइम्स प्रतिनिधी
चारी क्रमांक ३२ व ३३ वर अतिक्रमण; पाणीपुरवठा बंद; शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
बेलापूर (प्रतिनिधी) बेलापूर परिसरातील चारी क्रमांक ३२ व ३३ वर झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर-वडाळा शाखेला निवेदन देत तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली.
हे निवेदन लोकनेते भानुदासजी मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. चारीवरील अतिक्रमण हटवून त्याचे दुरुस्ती काम तत्काळ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. निवेदन स्वीकारताना शाखा अभियंता इंजिनिअर कलापुरे यांनी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना प्रमुख शेतकरी दीपक निंबाळकर, भगवान सोनवणे, विक्रम नाईक व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सांगितले की, "चारी बंद असल्याने आम्हाला सिंचनासाठी पर्यायी व महागड्या साधनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे."
या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
(शीतल टाईम्स / प्रतिनिधी विक्रम नाईक)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा