शीतल टाईम्स //- बिबट्याच्या धडकेत मायलेक जखमी; सुदैवाने वाचले प्राण

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बिबट्याच्या धडकेत मायलेक जखमी; सुदैवाने वाचले प्राण

बेलापूर (प्रतिनिधी) – आंबी येथून पुण्याकडे निघालेल्या मायलेकांच्या मोटरसायकलला अचानक बिबट्याने धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. सुदैवाने प्राणहानी टळली असून, त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबी येथील अलका भगवान वायदंडे (वय ४५) आणि त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे (वय २८) हे पुणे येथे जाण्यासाठी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता मोटरसायकलने निघाले होते. दरम्यान, श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी रस्त्याच्या वळणावर त्यांच्या गाडीला अचानक एका बिबट्याने जोरदार धडक दिली.

या अपघातात बिबट्याही काही अंतरावर फेकला गेला, तर विशाल आणि अलका वायदंडे रस्त्यावर पडून जखमी झाले. धडक दिल्यानंतर बिबट्या तात्काळ जवळील झुडपांमध्ये निघून गेला. दोघांनाही तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याच्या थेट धडकेतूनही प्राण वाचल्याने मायलेकांनी देवाचे आभार मानले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वनविभगाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव