शीतल टाईम्स //- पुणतांबा येथील बोर्डे बंधू बनले शासकीय अधिकारी! धीरज जलसंपदा विभागात अभियंता, तर सूरज नगरपालिका लेखाधिकारी

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी



पुणतांबा येथील बोर्डे बंधू बनले शासकीय अधिकारी!

धीरज जलसंपदा विभागात अभियंता, तर सूरज नगरपालिका लेखाधिकारी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – पुणतांबा येथील रहिवासी धीरज व सूरज संपतराव बोर्डे या जुळ्या बंधूंनी शासकीय सेवेत उल्लेखनीय यश मिळवत आपल्या कुटुंबीयांचा आणि गावाचा अभिमान वाढवला आहे.

धीरज बोर्डे यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता (ज्युनियर इंजिनिअर) पदासाठी झाली आहे. त्यांनी यासाठी घेतलेल्या परीक्षेत यश मिळवले आहे. दुसरीकडे, सूरज बोर्डे यांची सन २०२० मध्ये नगरपालिका विभागात लेखाधिकारी म्हणून निवड झाली असून सध्या ते बुलढाणा नगरपालिकेत कार्यरत आहेत.

धीरज व सूरज हे दोघेही अशोक सहकारी साखर कारखान्यातील माजी कर्मचारी श्री. संपतराव बोर्डे यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही जुळे बंधू असून, त्यांच्या एकाच वेळी शासकीय सेवेत निवडीची ही घटना गावासाठी दुर्मिळ आणि प्रेरणादायी ठरली आहे.

बोर्डे बंधूंच्या या यशाबद्दल भास्कर खंडागळे, नानासाहेब जोंधळे, अ‍ॅड. एन. जी. खंडागळे, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव