शीतल टाइम्स //-बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचा महावितरणला इशारा गावातील लोडशेडिंग तातडीने थांबवा, अन्यथा आंदोलन
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचा महावितरणला इशारा
गावातील लोडशेडिंग तातडीने थांबवा: अन्यथा आंदोलन
बेलापूर (प्रतिनिधी)
बेलापूरगवात महावितरणकडून अचानक लोडशेडिंग सुरू केल्याने ग्रामपंचायतीने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरपंच मीनाताई साळवी व उपसरपंच चंद्रकांत नवले यांच्या वतीने महावितरणच्या सहाय्यक अभियंता यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे.
दिनांक २५ जूनपासून बेलापूर गावामध्ये सकाळी ६ ते ८ आणि दुपारी ४ ते ६ अशा दोन वेळा लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. बेलापूर शहर विभागात नियमितपणे वीजबिलांची चांगली वसुली होत असतानाही लोडशेडिंग लादणे अन्यायकारक असल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे.
लोडशेडिंगमुळे गावातील व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासोबतच गावातील पाणीपुरवठा देखील विस्कळीत होत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीने निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तातडीने लोडशेडिंग बंद केले नाही तर ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल. सदर आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी महावितरणवर राहील, असा इशारा सरपंच मीनाताई साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले यांचेसह सदस्यांनी दिला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा