शीतल टाइम्स //-राहुरीत बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी लॉज मालकास पोलीस कोठडी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
राहुरीत बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी लॉज मालकास पोलीस कोठडी
राहुरी (प्रतिनिधी) :
राहुरी तालुक्यातील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात निष्काळजीपणाने मदत केल्याप्रकरणी लॉज मालकास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्र. 917/25 नुसार भादंवि कलम 64(1) सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 4, 8, 12 आणि कलम 17 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. शिगवे नाईक येथील 27 वर्षीय लॉज मालकाने पीडित अल्पवयीन मुलीस ओळखपत्र न पाहता लॉजवर रूम उपलब्ध करून दिल्यामुळे त्याला गुन्ह्यात सामील करण्यात आले. तपासात आरोपीने अप्रत्यक्षरीत्या गुन्ह्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमानुसार आरोपीस आजन्म सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा होऊ शकते.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकरणांत हॉटेल, लॉज, कॅफे किंवा रेस्टॉरंट मालकांकडून अल्पवयीनांना रूम उपलब्ध करून देण्यात आली असल्यास कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांचे वय पडताळूनच रूम द्याव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा