शीतल टाइम्स //- श्रीरामपूर गोळीबार प्रकरणी एक आरोपी ताब्यात नेवासा येथून अटक, गुन्ह्याची दिली कबुली

  

शीतल टाइम्स प्रतिनिधी


श्रीरामपूर गोळीबार प्रकरणी एक आरोपी ताब्यात

नेवासा येथून अटक, गुन्ह्याची दिली कबुली



बेलापूर (प्रतिनिधी) 

श्रीरामपूर शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला नेवासा येथून ताब्यात घेतले आहे. हुजेब अनिस शेख (वय २१, रा. श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

शहरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी आपापसातील वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार करताना दिसले होते. या घटनेने शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ नुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, त्यामुळे पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत होती.

काल सायंकाळी आरोपी हुजेब शेख हा नेवासा येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यामागील नेमके कारण काय? आणि आरोपीने वापरलेला गावठी कट्टा कोठून खरेदी केला? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव