शीतल टाइम्स //- संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी शरद नवले यांची निवड शासन निर्णय जाहीर
शीतल टाइम्स प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी शरद नवले यांची निवड
2019 च्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या अध्यक्षपदी. माजी जी.प.सदस्य शरद नवले यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भात, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही शिफारस केली होती. मुंबई येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक ३० ऑगस्ट २०१९ रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता. त्याअन्वये जिल्हा व तालुका पातळीवरील समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून त्याच अनुषंगाने श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी शरद नवले यांची नियुक्ती झाली आहे.
यामुळे तालुक्यातील निराधार आणि गरजू व्यक्तींना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत होईल, श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात वृद्ध, निराधार, विधवा आणि दिव्यांग घटकांची संख्या मोठी आहे. या सर्वांना योजनांचा लाभ सहज, पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने मिळावा यासाठी नव्याने नियुक्त अध्यक्ष शरद नवले यांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या समितीद्वारे संजय गांधी निराधार अनुदान, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन आदी योजनांचा लाभ दिला जातो. श्री नवले यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील नागरिकांना या योजनांचा लाभ अधिक वेगाने आणि सोप्या पद्धतीने घेता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ही समिती समाजकल्याण विभाग आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने काम करेल.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा