शीतल टाइम्स //-बेलापूरची राज्यातील सर्वात मोठी घरकुल वसाहत अद्ययावत व आदर्श ठरावी : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

  

शीतल टाइम्स प्रतिनिधी


बेलापूरची राज्यातील सर्वात मोठी घरकुल वसाहत अद्ययावत व आदर्श ठरावी : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया 

बेलापूर (प्रतिनिधी) : 

पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून बेलापूर येथे तब्बल ११०० घरकुले मंजूर झाली असून त्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी ठरणारी ही घरकुल वसाहत अद्ययावत व आदर्श ठरावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केली.

डॉ. आशिया यांनी नुकतीच बेलापूर येथील घरकुल वसाहत स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीकडून सविस्तर माहिती घेतली तसेच ग्रामपंचायत राबवीत असलेल्या मियावाकी वृक्षलागवडीचीही पाहणी केली.

या भेटीदरम्यान जि.प. सदस्य शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मिना साळवी यांनी माहिती दिली. तसेच प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के, विस्तार अधिकारी विजय चराटे, ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख, अँड. अरविंद साळवी, बाबुराव पवार व ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे उपस्थित होते.

नवले व खंडागळे यांनी सांगितले की, पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून ग्रामपंचायतीस ३४ एकर जागा मोफत मिळवून दिली असून त्यावर ११०० घरकुलांची वसाहत उभारण्यात येणार आहे. वसाहतीत रस्ते, शाळा, क्रीडांगण, सांस्कृतिक भवन, उद्यान तसेच सर्व समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी अशा सर्व सुविधा उपलब्ध असतील.

ही वसाहत रो-हाऊसिंग पद्धतीने उभारण्याचे नियोजन असून त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही पद्धत ऐच्छिक असून ज्यांना स्वतःच्या पद्धतीने घर बांधायचे आहे, त्यांना तशी मुभा असेल.

रो-हाऊसिंगबाबत सांगताना नवले व खंडागळे म्हणाले की, बांधकाम खर्चाचे अंदाजपत्रक स्थानिक अभियंते व ठेकेदारांकडून मागविण्यात आले आहे. त्यातील सर्वात कमी खर्चाच्या निविदा स्वीकारल्या जातील. शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख ९३ हजारांच्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त खर्चाचा भार लाभार्थ्यांनी उचलावा लागेल.

यानंतर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी मियावाकी वृक्षलागवडीची पाहणी केली व घरकुल तसेच हरित उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

"भर पावसात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घरकुल वसाहतीची सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच मियावाकी वृक्षलागवडीचीही पाहणी केली."




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव