शीतल टाइम्स //-जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर ओबीसीसाठी २७ टक्के आरक्षण राखीव
शीतल टाइम्स प्रतिनिधी
जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर
ओबीसीसाठी २७ टक्के आरक्षण राखीव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी गट व गणांची अंतिम प्रभागरचना नुकतीच (२२ ऑगस्ट) प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर आता प्रतिक्षा आहे ती गट व गणांच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाची. ग्रामविकास विभागाने २० ऑगस्ट रोजी ‘आरक्षण नियम २०२५’ जाहीर केले असून, या नव्या नियमांनुसार आरक्षण पद्धतीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
नवीन आरक्षण नियमांनुसार प्रत्येक गट व गणात लोकसंख्येच्या प्रमाणावर अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व महिलांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. विशेष म्हणजे, ओबीसी प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षण राखून ठेवण्यात आले आहे.
गेल्या निवडणुकीत वापरलेल्या पद्धतीऐवजी यावेळी आरक्षणाची रचना वेगळ्या पद्धतीने केली जात असल्यामुळे राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यातील १५–१६ गावांमध्ये नव्याने गटबांधणी झाल्यानंतर आरक्षण सोडतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आगामी आठ–दहा दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा