शीतल टाइम्स //-लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज, हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई

  

शीतल टाइम्स प्रतिनिधी


लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज, हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई

     बेलापूर ( प्रतिनिधी )

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणे गुन्हा आहे त्याचबरोबर आता लैंगिक अत्याचार करण्याकरता जागा उपलब्ध करून देणारा देखील सह आरोपी होणार आहे त्यामुळे हॉटेल लॉज मालक कॅफेचालक यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले आहे.   
    
या बाबत प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पुढे म्हटले आहे की सर्वच हॉटेल लॉज व कॅफे चालकांना सूचित करण्यात येते की आपल्या हॉटेल लॉज मध्ये येणाऱ्या व्यक्तीची वित नमुन्यातील रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी त्यांच्या वयाची पडताळणी करावी संबंधित पुरावा आपल्या अभिलेखावर ठेवावा किरकोळ स्वरूपाच्या आर्थिक फायद्यासाठी वरील सूचनाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात त्याचे गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.  बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर अर्थात अठरा वर्षाखालील कमी वयाच्या बालकावर कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर असा लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती हा आरोपी असतो.

परंतु याच कायद्यातील  काही कलमानुसार असा अत्याचार करणे सोपे होईल अशा स्वरूपाची मदत करणारा देखील सह आरोपी असतो व त्यालाही मुख्य आरोपी इतकीच शिक्षा असते. याचाच अर्थ  अशा स्वरूपाच्या अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक अर्थात हॉटेलचा,लॉजचा मालक/ चालक, कॅफे चालक/ मालक इत्यादी देखील या कायद्यानुसार आरोपी असतात व त्यांना देखील लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी इतकीच अर्थात दहा वर्षापेक्षा जास्त कारावासाची  शिक्षा असते.

     या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशन येथे बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीने लैंगिक अत्याचारासाठी दोन वेगवेगळे लॉजचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दोन्हीही लॉज /हॉटेल चालक  यांना सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आले आहे. 

     श्रीरामपूर विभागात अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या अंतर्गत एकूण 17 पोलीस स्टेशन येतात. या सतरा पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचाराखालील दाखल व तपासावर असणाऱ्या गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये जर कोणी हॉटेल/ लॉज चालक, मालक याने निष्काळजीपणे संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आपले हॉटेल किंवा लॉज उपलब्ध करून दिला असेल तर त्यांना देखील गुन्ह्यांमध्ये सह आरोपी करण्यात येणार आहे. तसेच यापुढे अशा स्वरूपाच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जर हॉटेल किंवा लॉजचा,कॅफेचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित हॉटेल चालक-मालक, कॅफे चालक -मालक, लॉज  चालक-मालक यांना देखील सह आरोपी करण्यात येईल.

त्यामुळे सर्वच हॉटेल लॉज चालकांना सूचित करण्यात येते की आपल्या हॉटेलमध्ये, लॉज मध्ये येणाऱ्या व्यक्तींची विहित नमुन्यातील रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी.त्यांच्या वयाची पडताळणी करावी व यासंबंधीचा पुरावा आपल्या अभिलेखावर ठेवावा. किरकोळ स्वरूपाच्या आर्थिक फायद्यासाठी वरील सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

श्रीरामपूर विभागामध्ये संगमनेर,लोणी, कोपरगाव,सोनई त्याचप्रमाणे अन्य शहरांमध्ये मोठी शैक्षणिक संकुले आहेत. त्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून मुले मुली शिक्षणासाठी येत असतात.  त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी विद्यार्थिनी हे अल्पवयीन असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वरील प्रमाणे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी आपले लॉज,हॉटेल उपलब्ध करून देणाऱ्या चालकांवर,मालकांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.असेही प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव