शीतल टाइम्स //- बेलापूर सबस्टेशन अंतर्गत वीज वितरणाचा बोजवारा लोडशेडींग लादणे अयोग्य - खंडागळे,मुथा

  

शीतल टाइम्स प्रतिनिधी


बेलापूर सबस्टेशन अंतर्गत वीज वितरणाचा बोजवारा लोडशेडींग लादणे अयोग्य - खंडागळे, मुथा

बेलापूर प्रतिनिधी: 

महावितरणच्या बेलापूर सबस्टेशन अंतर्गतच्या विज वितरणाचा आधीच बोजवारा उडाला असताना लोडशेडींग जाहिर केल्याने बेलापूर-ऐनतपूर पंचक्रोशितील वीज ग्राहकांत असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. गावाची विजबिल वसूली समाधानकारक असताना थकबाकीदारांवर कारवाई करणेऐवजी संपूर्ण गावाला वेठीस धरणे अन्यायकारक आहे.

सदरचे लोडशेडींग रद्द करावे अन्यथा जन आंदोलनाला  सामोरे जावे असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भास्कर खंडागळे व सुनील मुथा यांनी दिला आहे. प्रसिध्दीपञकात श्री.खंडागळे व श्री.मुथा यांनी म्हटले आहे की,महावितरणने कारण नसताना दररोज चार तास लोडशेडींगचा निर्णय घेतला आहे.

वास्तविक गावाची विजबिलाची वसुली समाधानकारक आहे.जे थकबाकीदार असतील त्यांचेवर काय कारवाई करायची ती करावी.त्याची शिक्षा संपूर्ण गावाला कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोडशेडींगचा घेतलेला निर्णय सर्वार्थाने गैरलागू व अन्यायकारक आहे. या निर्णयाचा शेतकरी,व्यापारी,छोटे व्यवसायिक,पिठ गिरणीधारक,मसाले कांडप,डाळ मिल असे लघुद्योग करणारांवर होत आहे.तसेच सकाळची वेळ हि पाणी व शाळकरी मुलांच्या जेवणाच्या तयारीची असते.याचे कोणतेही भान न राखता सदरचे लोडशेडींग लादण्यात आले आहे. 

वास्तविक दर शनिवारी आठ तास दुरुस्ती व देखभालीच्या कारणास्तव शटडाऊन घेतला जातो.इतके होवूनही दररोज लिंक तुटणे,लाईन फाॕल्ट आदी कारणास्तव दररोज दोन तीन तास वीजपुरवठा खंडीत केला जातो.हे अप्रत्यक्षपणे लोडशेडींगच आहे.असे असताना स्वतंञपणे लोडशेडींग कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो.

सदरच्या निर्णयामुळे बेलापूर सबस्टेशन अंतर्गतच्या वीज ग्राहकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे.अशास्थितीत महावितरणने लोडशेडींगचा निर्णय रद्द करावा अन्यथा बेलापूर-ऐनतपूर पंचक्रोशीतील वीजग्राहकांसह तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा श्री.खंडागळे व श्री.मुथा यांनी दिला आहे.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव