बेलापूरला गावकरी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रविवारी चित्रकला स्पर्धा



बेलापूरला गावकरी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रविवारी चित्रकला स्पर्धा

बेलापूर (प्रतिनिधी): बेलापूर बु-ऐनतपूर गावकरी मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता संत सावता मंदिर, अरुणकुमार वैद्य पथ, बेलापूर येथे होणार आहे.

स्पर्धा केवळ बेलापूर-ऐनतपूर येथील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असून दोन गटात घेतली जाणार आहे.

🔸 छोटा गट (इयत्ता १ ली ते ४ थी)
विषय – मुक्त चित्र

प्रथम क्रमांक – रु. ११११/- (श्रेया मोटर्स, श्रीरामपूर रोड)

द्वितीय क्रमांक – रु. ७७७/- (शुभम जनरल व झेरॉक्स)

तृतीय क्रमांक – रु. ५५५/- (गुरुकृपा फोटो स्टुडिओ)

🔸 मोठा गट (इयत्ता ५ वी ते १० वी)
विषय – माझे आवडते व्यक्तिमत्व, ऐतिहासिक किंवा पौराणिक प्रसंग, ऑपरेशन सिंदूर

प्रथम क्रमांक – रु. २२२२/- (भागवत प्रतिष्ठान, बेलापूर बु)

द्वितीय क्रमांक – रु. ११११/- (श्री. रामेश्वर सोमाणी, व्हा. चेअरमन, गावकरी पतसंस्था)

तृतीय क्रमांक – रु. ७७७/- (विशाल मंडप डेकोरेटर्स)

स्पर्धेसाठी लागणारा कागद संयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र रंग व इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी दिलेल्या वेळेतच चित्र पूर्ण करावे लागेल.

नोंदणीसाठी –

प्रमोद जनरल स्टोअर्स, मेनरोड, बेलापूर बु (श्री. हेमंत मुथ्था – ८८३०८४८०९०)

सुदर्शन सुपर शॉपी, मेनरोड, बेलापूर बु (श्री. सुधीर करवा – ९०११७९४४९८)

महावीर शॉपी अँड जनरल स्टोअर्स, मेनरोड, बेलापूर बु (श्री. संतोष ताथेड – ८७९३६३७२६३)

जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव