शीतल टाइम्स //- आई म्हणजे साक्षात देवी स्वरुप : धनश्री विखे

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी




आई म्हणजे साक्षात देवी स्वरुप : धनश्री विखे

बेलापूर (प्रतिनिधी):

सध्या नवरात्रोत्सव सुरू असून आई म्हणजे साक्षात देवीचे स्वरुप असते, असे प्रतिपादन सौ. धनश्री सुजयदादा विखे पा. यांनी केले. विखे परिवार हा समाजसेवेला प्रधान्य देणारा असून जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याचाच भाग म्हणून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बेलापूर-ऐनतपूर परिसरातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना टिफिनचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम जनसेवा फौंडेशन (लोणी) व गावकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. जि.प. प्राथमिक मराठी शाळा, जि.प. मुलींची शाळा, जि.प. उर्दू शाळा, अहिल्याबाई होळकर उर्दू शाळा, ऐनतपूर व सुभाषवाडी जि.प. शाळा, कुहे वस्ती, सातभाईवस्ती या शाळांतील विद्यार्थ्यांना टिफिन वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प. सदस्य शरद नवले यांनी भूषवले. यावेळी अभिषेक खंडागळे, गिरीधर आसने, भिमराव बांद्रे, रामराव शेटे, सौ. स्वाती चव्हाण, डॉ. शंकर मुठे, अनिल थोरात, महेंद्र पटारे, महेश खरात, विराज भोसले, विशाल अंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सहाय्यक अभियंता शिरीष वाणी यांचा महावितरण उपविभाग मंजुरीसाठी सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात श्री. शरद नवले म्हणाले की, विखे परिवार हा सुसंस्कृत व सामाजिक जाणिवा असलेला परिवार असून पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे पा., माजी जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे पा. व माजी खा. डॉ. सुजयदादा विखे पा. यांनी बेलापूर-ऐनतपूर गावांच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य केले आहे.

प्रास्ताविकात अभिषेक खंडागळे यांनी पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे पा. व सुजयदादा विखे यांच्या पुढाकारातून मंजूर झालेली १२६ कोटींची पाणीपुरवठा योजना, एक हजार घरकुले, तसेच नुकत्याच मिळालेल्या महावितरणच्या उपविभागाच्या मान्यतेची माहिती दिली.
भाजपचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले. मुश्ताक शेख यांनी अध्यक्षीय सूचना मांडली, प्रभात कुऱ्हे यांनी अनुमोदन दिले. अनिल ओहोळ यांनी सूत्रसंचालन तर गोपी दाणी यांनी आभारप्रदर्शन केले.

जि.प. मुलींच्या शाळेच्या लेझीम पथकाने मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळाचे कार्यकर्ते, महिला वर्ग, शिक्षकवर्ग, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे, तसेच सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. 




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव