शीतल टाइम्स //- मा.आ.भानुदास मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापुरात मिनी मॅरेथॉनचे आयोजन
शीतल टाइम्स प्रतिनिधी
मा.आ.भानुदास मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापुरात मिनी मॅरेथॉनचे आयोजन
बेलापूर (शीतल टाइम्स प्रतिनिधी) :
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त हरिहर फाऊंडेशन, बेलापूर यांच्या वतीने भव्य मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता होणार असून, पुरुष गटातील ही स्पर्धा सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली आहे.
या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक ५,१०० रुपये, द्वितीय पारितोषिक ३,१०० रुपये तर तृतीय पारितोषिक २,१०० रुपये असेल.
स्पर्धेचा मार्ग झेंडा चौक-अजय विजय सर्व्हिस स्टेशन – झेंडा चौक (बेलापूर-श्रीरामपूर रस्ता) असा निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क केवळ २१ रुपये ठेवण्यात आले आहे.
इच्छुक स्पर्धकांनी वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ऋषिराज मोबाईल शॉपी, बेलापूर (मो. ९८८१८१८२२८, ९१३०३३२२७४) किंवा गोविंद ड्रायक्लिनर्स, बेलापूर (मो. ७७७६८२०३८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मॅरेथॉनमध्ये परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हरिहर फाऊंडेशनने केले आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा