शीतल टाइम्स //- ज्येष्ठ पत्रकाराच्या घरासमोरून चंदनाचे झाड चोरीला गजबजलेल्या वस्तीमध्ये चोरी : बेलापूर पोलिसांसमोर आव्हान!
शीतल टाइम्स प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकाराच्या घरासमोरून चंदनाचे झाड चोरीला
गजबजलेल्या वस्तीमध्ये चोरी : बेलापूर पोलिसांसमोर आव्हान!
बेलापूर (वार्ताहर):
श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर वीरभद्रेश्वर मंदिराजवळील नवले वस्ती येथे आज रविवार (दि. 21 सप्टेंबर) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास चंदन चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली. ज्येष्ठ पत्रकार सुनील नवले यांच्या मालकीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी तोडून नेले असून या झाडाची किंमत अंदाजे १० ते १५ हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते.
नवले यांनी हे झाड लहानपणापासून जपले होते. रोजच्या पाण्यामुळे व काळजीपूर्वक संगोपनामुळे वाढलेले हे झाड अचानक चोरीला गेल्याने नवले कुटुंब हतबल झाले आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून चंदन चोरट्यांनी गजबजलेल्या वस्तीवरच ही चोरी करून बेलापूर पोलिसांना सरळसरळ आव्हान दिले आहे.
घटनेच्या वेळी नवले यांचे चुलत बंधू झाडाशेजारी असलेल्या खोलीत झोपले होते. झाड पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता चोर झाड तोडत असल्याचे दिसून आले. तत्काळ त्यांनी इतरांना उठवले, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी झाडाचा आतला गाभारा घेऊन पलायन केले होते. नवले कुटुंबाने चोरांचा पाठलाग केला; परंतु ते फरार झाले.
या प्रकरणी पत्रकार सुनील नवले यांनी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. खुद्द पत्रकाराचेच चंदनाचे झाड चोरी गेल्याने त्यांचे चाहते आश्चर्यचकीत झाले असून या घटनेबद्दल त्यांच्या मनात संताप व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेलापूर परिसरात काही चंदन चोरटे वास्तव्य करत असून ते गावात व परिसरात रेकी करून बाहेरील साथीदारांना माहिती देतात, अशी शंका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. चंदन चोरीतील चोरट्यांचा तपास लावून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नवले कुटुंबासह ग्रामस्थांनी केली आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा