शीतल टाइम्स //- आठवाडी एकलहरे येथे बिबट्याचा कहर : तीन शेळ्यांचा बळी नागरिक दहशतीत; पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची व भरपाई देण्याची मागणी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
आठवाडी एकलहरे येथे बिबट्याचा कहर : तीन शेळ्यांचा बळी
नागरिक दहशतीत; पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची व भरपाई देण्याची मागणी
श्रीरामपूर प्रतिनिधी :
तालुक्यातील आठवाडी (एकलहरे) गावात बिबट्याने उधळलेला कहर पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. नारायण साहेबराव गंगातीवरे यांच्या घराजवळ आलेल्या बिबट्याने तब्बल तीन शेळ्यांना ठार केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेलापूर-ऐनतपूर तसेच वळदगाव परिसरातही मागील काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व गावकरी दहशतीखाली जीवन जगत आहेत. संध्याकाळनंतर नागरिकांना घराबाहेर पडणे धोकादायक ठरत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच, गंगातीवरे कुटुंबाच्या शेळ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना व इतर संभाव्य पीडित पशुपालकांना तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे गावकऱ्यांचा संयम सुटत चालला असून वनविभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांमध्ये रोषाची भावना तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा