शीतल टाइम्स /- व्यसनमुक्ती ही काळाची गरज- डॉ. वसंतराव जमधडे

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी


व्यसनमुक्ती ही काळाची गरज- डॉ. वसंतराव जमधडे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :


मातृ-पितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिरात अध्यक्षीय भाषण करताना डॉ. वसंतराव जमधडे यांनी व्यसनमुक्ती कार्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, “व्यसन हे समाजाला लागलेली एक कीड आहे. हे संपवायचे असेल तर प्रत्येकाने व्यसनमुक्ती दूत बनून व्यसनी घटकापर्यंत पोहोचून प्रत्यक्ष प्रबोधन करावे लागेल. हे कार्य सहजासहजी साध्य होत नाही, त्यात वाहून घ्यावे लागते, तेव्हाच समाजाचे शैक्षणिक व आर्थिक प्रगती साध्य होईल आणि कुटुंब व्यवस्था सुधारेल.”

या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. आदर्श शिक्षक सुजित बनकर, बाळासाहेब पाटोळे, योगेश राणे, इकबाल काकर, शिवनाथ नारायणी, महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त प्रा. बाबासाहेब शेलार, विश्वनाथ आल्हाट, अशोकराव बागुल, पोलीस हवालदार मच्छिंद्र शेलार (बेस्ट कॉप ऑफ द मंथ व गुन्ह्याचा जलद शोध लावल्याबद्दल) यांचा गौरव झाला. तसेच गणेश पिंगळे सर यांना उत्कृष्ट स्वीप नोडल अधिकारी विधानसभा श्रीरामपूर पुरस्कार, अमोल सोनवणे व विकास जगधने यांना विधी महाविद्यालयातील विशेष प्राविण्य, तर नव्याने पदभार स्वीकारलेले अशोकराव दिवे, मिलिंदकुमार साळवे, डॉ. सलीम शेख, शाहीर कदम, डॉ. दुशिंग, प्रा. डॉ. दीपक जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघ सलीमखान पठाण, काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष रावसाहेब आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते अरुण मंडलिक, भगवानराव जाधव, रघुनाथ जाधव, काळुराम बोरुडे, बाळासाहेब बोरुडे, भास्करराव बोरुडे, दत्तात्रय बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पिंगळे यांनी केले तर आभार अरुण बोरुडे यांनी मानले.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव