शीतल टाईम्स //- सौ.धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टिफिन वाटप
शीतल टाइम्स प्रतिनिधी
सौ.धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टिफिन वाटप
बेलापूर (वार्ताहर):
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जनसेवा फाउंडेशन (लोणी) व गावकरी मंडळाच्या पुढाकारातून बेलापूर बु. व ऐनतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना टिफिन (भोजनाचे डबे) वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, टिफिन वाटपाचा शुभारंभ सौ. धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
लोणी येथील जनसेवा फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, नवरात्रोत्सवाच्या औचित्याने मुलांना टिफिन वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या प्रसंगी गावकरी मंडळ तसेच नागरिक व विद्यार्थ्यांचे पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा