शीतल टाइम्स //- प्रवरा नदीपात्रात पुलावरून उडी घेऊन मध्यमवयीन व्यक्तीची आत्महत्या : शोधमोहीम सुरू

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी

प्रवरा नदीपात्रात पुलावरून उडी घेऊन मध्यमवयीन व्यक्तीची आत्महत्या : शोधमोहीम सुरू



बेलापूर (प्रतिनिधी) :

बेलापूर येथे प्रवरा नदीवरील पुलावरून एका मध्यमवयीन व्यक्तीने आज आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीने उडी मारण्याआधी आपल्या चपला पुलावर बाजूला काढून ठेवल्या आणि थेट नदीपात्रात झेप घेतली.

घटनेनंतर पुलावर तसेच नदीकाठावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. बघ्यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे वाहतुकीसही काही काळ अडथळा निर्माण झाला होता.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी पो.कॉं. संपत बडे व पो.कॉं. भारत तमनर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ गर्दी हटवून नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. अद्याप मृतदेह सापडलेला नाही.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दर पावसाळ्या दरम्यान या ठिकाणी एक दोघांच्या आत्महत्या होतच असतात, त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी शोध पथकासह इतर आवश्यक तपास सुरू केला आहे.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव