शीतल टाइम्स //- बेलापूर-ऐनतपूरमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान; अभिषेक खंडागळे यांच्यासह अधिकारी, कार्यकर्त्यांचा पाहणी दौरा
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर-ऐनतपूरमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान; अभिषेक खंडागळे यांच्यासह अधिकारी, कार्यकर्त्यांचा पाहणी दौरा
बेलापूर (वार्ताहर):
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक आणि ऐनतपूर परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा बेलापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी आज सकाळी ६ वाजल्यापासून केला. त्यांच्यासोबत ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, महावितरणचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
श्री.खंडागळे यांनी नुकसानग्रस्त रहिवासी ग्रामस्थांना दिलासा देत, ग्रामपंचायतीकडून शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कोणतीही अडचण आल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश ग्राममहसूल अधिकारी यांना देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वीज वितरण तारा आणि पोल पडले असल्याने, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
पाहणी केलेल्या भागांमध्ये: कोल्हार चौक, कुऱ्हे वस्ती, पाहुणेनगर, अयोध्या कॉलनी, खटोड कॉलनी, तसेच पाण्याच्या टाकीजवळ असलेला ओढा, बाजार तळ, रामगड आणि दिघी रस्त्याचा समावेश होता.
या पाहणी दौऱ्यात पत्रकार दिलीप दायमा यांनी पाण्याच्या टाकीजवळील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर, आड ओढ्या जवळ वजन काट्याच्या मागील ओढा रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचे काम इरिगेशन व ड्रेनेज विभागाशी संपर्क साधून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन श्री. खंडागळे यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, काही घरे गळाली आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता, सर्व ग्रामस्थांनी संकटग्रस्तांना आपापल्या परीने सहकार्य आणि मदत करावी, असे आवाहनही श्री. खंडागळे यांनी केले आहे.
या पाहणी दौऱ्यात ग्राममहसूल अधिकारी विजय खेमनर, अक्षय जोशी, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे, महावितरणचे मधुकर अवचिते, आशिष लांडे, आणि ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, सोमनाथ शिरसाठ, राहुल माळवादे, सचिन वाघ, अशोक गवते, संजय भोंडगे, बबन मेहेत्रे, गणेश बंगाळ, तुकाराम मेहेत्रे, कारभारी भगत, सुनिल साळुंके, साईनाथ शिरसाठ, रमेश लगे, नितीन खोसे, नितीन कुऱ्हे, दिनेश पानसरे, गणेश टाक, किरण बारहाते, मोईन शेख, मुहाफिज शेख, रविंद्र शिरसाठ, सोमनाथ लगे, पोपट शिरसाठ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा