शीतल टाइम्स //- परतीच्या पावसाने बेलापूर परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे हाल

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी

परतीच्या पावसाने बेलापूर परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे हाल



बेलापूर (वार्ताहर) :

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. व परिसरात काल 19 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तोंडावर आलेल्या पिकांचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

सुभाष वाडी रोड, वळदगाव, अशोकनगर रोड व ऐनतपूरकडे जाणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळील ओढ्यावर रात्री सात वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत पाणी वाहत होते. या ओढ्यावरून पाणी वाहत असल्यामुळे सुभाष वाडी, नवले वस्ती, बंगाळ वस्ती, वळदगाव व अशोकनगर परिसरातील नागरिकांचे मोठे हाल झाले. नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटल्याने वस्तीतील लोकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागला.

बंगाळ वस्ती व नवले वस्तीतील नागरिकांना सुभाष वाडी रोडने तर वळदगाव हद्दीतील नागरिकांना भोसले वस्तीमार्गे प्रवास करावा लागला. मात्र हा मार्ग लांब असल्याने नागरिकांना अंधारात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. रात्रीचा अंधार, त्यात सतत पडणारा पाऊस आणि बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये  धोक्याची भावना निर्माण झाली होती.

या भागातील ओढ्यावर मोठे पाईप टाकून वाहणारे पाणी नियंत्रित करावे व ओढा उचलून घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव