शीतल टाइम्स //- पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रयत्नातून बेलापूर सबस्टेशनला स्वतंत्र उपविभागाचा दर्जा
शीतल टाइम्स प्रतिनिधी
पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रयत्नातून बेलापूर सबस्टेशनला स्वतंत्र उपविभागाचा दर्जा
बेलापूर (प्रतिनिधी):
बेलापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) सबस्टेशनला अखेर स्वतंत्र उपविभागाचा दर्जा मिळाला आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ही मान्यता मिळाल्याची माहिती तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.
यापूर्वी बेलापूरचे सबस्टेशन श्रीरामपूर वीज विभागाशी जोडलेले होते. त्यामुळे वीज वितरणात सातत्याने अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर बेलापूर सबस्टेशनला स्वतंत्र उपविभाग करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. या मागणीसाठी पालकमंत्री नाम. विखे पा., माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पा. व महावितरण अधिकाऱ्यांकडे बेलापूर, ऐनतपूर, उक्कलगाव, एकलहरे, वळदगाव, उंबरगाव, पढेगाव, कान्हेगाव या गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सातत्याने पाठपुरावा केला.
या शिष्टमंडळात शरद नवले, अभिषेक खंडागळे, मीना साळवी, चंद्रकांत नवले, रणजीत श्रीगोड, जालिंदर कुहे, भाऊसाहेब कुताळ, रामराव शेटे, विराज भोसले, किशोर बनकर, विष्णुपंत डावरे, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, अनिल गाडे, बंडू तोरणे, प्रशांत लिप्टे, मुकुंद लबडे, महेश खरात, हाजी इस्माईलभाई शेख, मोहसीन सय्यद, शफिक बागवान, मुश्ताक शेख, लाल महम्मद जाहगीरदार, गणेश उमाप, रावसाहेब अमोलिक, सुभाष अमोलिक, दिलीप अमोलिक, भाऊसाहेब तेलोरे, अनिल थोरात, प्रकाश राजुळे, प्रभात कुहे, महेश कुहे, अजीजभैया शेख आदींचा समावेश होता.
या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून बेलापूर उपविभागास मान्यता मिळाल्याचे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांनी कळविले आहे. या निर्णयाबद्दल नाम. राधाकृष्ण विखे पा., माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पा., महावितरणचे उपअभियंता श्री. वाणी, श्री. भोगले, श्री. अवचिते यांचे कार्यकर्त्यांनी आभार मानले आहेत.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा