शीतल टाइम्स //- साईबाबा मंदिराच्या अन्नछत्र प्रसादालयाचे भूमिपूजन बेलापूर येथे मंगळवारी होणार मंगलमय सोहळा; साईभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी


साईबाबा मंदिराच्या अन्नछत्र प्रसादालयाचे भूमिपूजन

बेलापूर येथे मंगळवारी होणार मंगलमय सोहळा; साईभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन

बेलापूर (प्रतिनिधी): 

श्री साई पावन प्रतिष्ठान आणि श्री साई सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर बुद्रुक येथील श्री साई बाबा मंदिर येथे लवकरच अन्नछत्र प्रसादालय उभारले जाणार आहे. या अन्नछत्र प्रसादालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा मंगल सोहळा मंगळवार, दिनांक ३०/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद उपलब्ध व्हावा, या उदात्त हेतूने हे प्रसादालय उभारण्यात येत आहे. यासाठी समस्त साईभक्तांनी सहकार्य केले आहे.

या सोहळ्याला परिसरातील सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक आणि साईभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे श्री साई पावन प्रतिष्ठान आणि श्री साई सेवा समिती, बेलापूर बुद्रुक यांनी नम्र आवाहन केले आहे.

या भूमिपूजन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर साईभक्त उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने साईभक्त प्रकाश जाजू, साईभक्त महेश गोरे, साईभक्त सुजित सहाणी, साईभक्त भरत दायमा, साईभक्त गणिभाई पठाण (श्रीरामपूर), साईभक्त अशोक राशीनकर (चेअरमन, लोकमाता पतसंस्था, बेलापूर) आणि साईभक्त कांतीशेठ पटेल (श्रीरामपूर) यांची उपस्थिती राहणार आहे.

ज्या दानशूर साई भाविकांना वस्तू किंवा रोख स्वरूपात देणगी द्यायची असेल, त्यांनी अधिक माहितीसाठी कैलास चायल (संस्थापक, अध्यक्ष),  दीपक सिंकसी (उप. अध्यक्ष), राजेंद्र लखोटिया (सचिव) रमेश पवार (साई सेवा समिती) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव