शीतल टाइम्स //- स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना OBC/VJNT प्रदेशाध्यक्ष किसवे यांचा श्रीरामपूर दौरा

 

शीतल टाइम्स प्रतिनिधीप्रतिनिधी



स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना OBC/VJNT प्रदेशाध्यक्ष किसवे यांचा श्रीरामपूर दौरा

श्रीरामपूर (प्रतिनिधी):

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ओबीसी/व्हीजेएनटी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी अहिल्यानगर उत्तर येथील श्रीरामपूरला सदिच्छा भेट दिली. यावेळी शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

जिजामाता चौकात माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांच्या मंडळाच्या वतीने आरती करून सत्कार, तर गांधी चौकात जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांच्या शारदा उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यानंतर श्रीरामपूर गेस्टहाऊस येथे आयोजित बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष किसवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी आवश्यक संघटनात्मक मार्गदर्शन केले.

मूळ ओबीसीवर अन्याय होणार नाही !


या वेळी ते म्हणाले, "विकास आणि कल्याणाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर संघटनात्मक दौरे सुरू आहेत. ओबीसी/व्हीजेएनटीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता त्याचे संरक्षण केले जाईल. मूळ ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही," असे आश्वासनही त्यांनी दिले.

मान्यवरांची उपस्थिती


या बैठकीत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, कारखाना संचालक नीरज (भैय्या) मुरकुटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सारिका वाव्हळ, उपजिल्हाप्रमुख संजय बाहुले, संतोष डहाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शहराध्यक्ष विठ्ठल गोराणे, तालुका अध्यक्ष सागर कुदळे, उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, विशाल दुर्गे, राजेश वाव्हळ, संभाजी देवकर, प्रशांत खळेकर, गिरीश वाढेकर, महिला शहराध्यक्षा सविता वडिले, रवींद्र जाधव, सुनील फुलारे, अरुण जाधव, अशोक साळुंखे, देविदास दुधळे, अमोल शिंदे, महेश दाने, सोहम चिंधे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव