शीतल टाईम्स //- दीपावलीच्या मुहूर्तावर जे.टी.एस. हायस्कूलच्या 90-91 च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी




दीपावलीच्या मुहूर्तावर जे.टी.एस. हायस्कूलच्या 90-91 च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन


बेलापूर (वार्ताहर) 

बेलापूर येथील जे. टी. एस. हायस्कूलच्या सन 1990-91 च्या माजी विद्यार्थ्यांनी दीपावलीचा शुभमुहूर्त साधून आनंदी आणि भावनिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले.

या भेटीत विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत बालपणातील क्षण पुन्हा अनुभवले. गाण्यांच्या ठेक्यावर सगळेच बेधुंद होऊन नाचले, तर हास्यकट्ट्यावर गप्पा आणि किस्स्यांनी वातावरण रंगले. शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्या काळातील निरागस मैत्री यांची आठवण करत सर्वांचे डोळे पाणावले.

एकमेकांशी जीवनप्रवासातील अनुभव शेअर करताना उपस्थितांनी सांगितले की, “जीवन जगताना जर प्रामाणिक जिवलग सवंगडी सोबत असतील, तर औषधांची गरज भासत नाही.” विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व मित्र बालपणीच्या आठवणीत रममाण झाले होते.

सकाळी सुरू झालेले हे गेट-टुगेदर गप्पा, हशा आणि आठवणींच्या ओघात संध्याकाळपर्यंत रंगले. या गोड कार्यक्रमाची सांगता “कभी अलविदा ना कहना” या भावनिक गाण्याने करण्यात आली.








********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव