शीतल टाइम्स //- बेलापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य पथसंचलन

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी


बेलापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त भव्य पथसंचलन

बेलापूर (वार्ताहर) :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त बेलापूर शहरात आज (दि. २ ऑक्टोबर) भव्य संचलन काढण्यात आले. पांढऱ्या पोशाखात स्वयंसेवकांनी शिस्तीत हातात ढोल घेऊन, पारंपारिक वेशभूषेत या संचलनात सहभाग घेतला. शिस्तबद्ध पद्धतीने वादनासह काढलेल्या या संचलनाने परिसरात आकर्षणाचे केंद्र निर्माण झाले.

संचलनात विविध वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. हातात ढोल-ताशे घेऊन तालबद्ध चालत असलेल्या स्वयंसेवकांच्या या संचलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून अनेकांनी संचलनाचे स्वागत केले.

संघाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून बेलापूरमध्ये हे संचालन पार पडले. यावेळी पोलीस,  पत्रकारांसह नागरिक उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव