शीतल टाइम्स //- बेलापुरात गौसे आजम दर्गा उर्सनिमित्त महाप्रसादाचे वाटप
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापुरात गौसे आजम दर्गा उर्सनिमित्त महाप्रसादाचे वाटप
बेलापूर (वार्ताहर)
गौसे आजम सेवा भावी संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बेलापूर येथील गौसे आजम दर्गा उर्स मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दर्गाह परिसरात आकर्षक रोषणाई व फुलांनी सजावट करून धार्मिक वातावरण निर्मिती करण्यात आली होती.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, शफीक बागवान, मुस्ताक शेख, चंदू पाटील नाईक, रफिक (दादा) शेख, हाजी इस्माईल शेख, जावेद भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
उर्स कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरफराज (भैया) शेख, मोहसिन सय्यद, जब्बार अत्तार, रफिक शेख, हाजी मन्सूर सय्यद, रफीक शाह, अजीज भाई, तसेच गौसे आजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक मुख्तार सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख यांचे मोलाचे योगदान राहिले.
याशिवाय श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सोनू शेख, उपाध्यक्ष निसार शाह, सचिव सिराज अत्तार, राहुरी तालुका अध्यक्ष किशोर पवार, भोकर अध्यक्ष असिफ शेख, महिला अध्यक्ष सना काजी, बेलापूर अध्यक्ष अल्कमा शाह, कार्याध्यक्ष नासीर शेख, शोयब सय्यद, शाहरुख सय्यद, अदिल शेख, रेहान शेख, अतिक शेख, अयाज शेख, मुनाफ पिंजारी, फरान इनामदार, समीर शेख, मो. अली शेख, शमीद राकी, असीम तंबोली, रियाज तंबोली, हरून अत्तार, बबलू पिंजारी, गयाज पठाण, सद्दाम शेख, फरीद शेख, वाजिद शेख, मुजमिल सय्यद, जब्बार भाई बागवाले आदींनी उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
भाविकांनी दर्गाहात हजेरी लावून आशीर्वाद घेतला व महाप्रसादाचा लाभ घेत उत्साहात सहभाग नोंदविला.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा