शीतल टाइम्स / विश्वस्त मंडळात न घेतल्याने पोटदुखीतून देवस्थानची बदनामी- सतीश भगत कथित आरोपांचे पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत खंडन

शीतल टाइम्स प्रतिनिधी



विश्वस्त मंडळात न घेतल्याने पोटदुखीतून देवस्थानची बदनामी- सतीश भगत

कथित आरोपांचे पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत खंडन

बेलापूर (वार्ताहर)

बेलापूर खुर्द येथील हरिहर केशव गोविंद संस्थान बन ट्रस्टचा कारभार विकासाभिमुख व पारदर्शक असताना, केवळ विश्वस्त मंडळात न घेतल्याने असंतुष्ट व्यक्तींनी बिनबुडाचे आणि खोटे आरोप करून पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संस्थानचे अध्यक्ष सतीश भगत यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना भगत म्हणाले की, “जर आमचा कारभार चुकीचा असेल, तर संबंधित शासकीय यंत्रणा कारवाईसाठी सक्षम आहेत. परंतु काही जण केवळ वैयक्तिक पोटदुखीतून अफवा आणि बदनामी पसरवत आहेत.”

या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष फकीरराव पुजारी, विश्वस्त बापूसाहेब पुजारी, रावसाहेब हरदास, जयश्री पुजारी, कारभारी हरदास, ज्ञानदेव भगत, विनय भगत, निलेश हरदास तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

कथित आरोपांचे खंडन करताना भगत पुढे म्हणाले की, “मनमानी कारभार केला जातो हे पूर्णपणे असत्य आहे. सर्व निर्णय विश्वस्तांच्या बैठकीत घेतले जातात. भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहेत. देवस्थानातील गाळ्यांचे वाटप पारदर्शक लिलाव पद्धतीने करण्यात आले आहे. यात कोणतीही वशिलेबाजी झालेली नाही.”

भगत यांनी सांगितले की, देवस्थानला शेती व मंगल कार्यालयाचे भाडे हेच मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत आणि त्यातूनच देखभाल व व्यवस्थापन खर्च भागवला जातो. “आमचा कारभार पारदर्शक आहे. केवळ विश्वस्त मंडळात न घेतल्याच्या रोषातून देवस्थानवर खोटे आरोप केले जात आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

देवस्थान परिसरात मंगल कार्यालय, प्रवचन हॉल, मंदिराचे नुतनीकरण, महिला भक्त निवास यांसारख्या सुविधा निर्माण केल्या आहेत. तसेच भक्त व संत निवास, घाट विकास आणि सुशोभिकरण यासाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय नदीकाठच्या संरक्षक भिंतीचा प्रस्तावही सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले.

“देवस्थानच्या चालू विकासकामांना खिळ बसवण्यासाठीच काही मंडळी खोटी आरोपबाजी करत आहेत. यामुळे भाविकांमध्ये गैरसमज पसरू नयेत, म्हणून आम्ही हा पारदर्शक लेखाजोखा सार्वजनिक करीत आहोत,” असे भगत आणि उपस्थित विश्वस्तांनी स्पष्ट केले.



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव