शीतल टाइम्स //-माता वैष्णवदेवी भक्तांसाठी रेल्वे सेवा वाढविण्याची मागणी – श्रीरामपूर प्रवासी संघटनेचा निर्णय
माता वैष्णवदेवी भक्तांसाठी रेल्वे सेवा वाढविण्याची मागणी – श्रीरामपूर प्रवासी संघटनेचा निर्णय
श्रीरामपूर (वार्ताहर):
माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी उत्तर भारतात जाणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, रेल्वे सेवा वाढविण्याची मागणी श्रीरामपूर प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यासाठी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री. सतीषकुमार यांची भेट घेऊन लक्ष वेधण्याचा निर्णय संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
ही बैठक प्रवासी भवन येथे संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीचे प्रास्ताविक सेक्रेटरी अनिल कुलकर्णी यांनी केले.
बैठकीत रेल्वे संबंधी विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी सध्या केवळ पुणे-जम्मू तवी झेलम एक्सप्रेस हीच गाडी उपलब्ध असून ती अपुरी ठरत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवासी संघटनेने खालील मागण्या केल्या आहेत :
🔹 पुणे–कटरा वंदेभारत एक्सप्रेस सुरु करावी.
🔹 कोल्हापूर–हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्सप्रेस (गाडी क्र. १२१४७/१२१४८) ही गाडी कटरा पर्यंत वाढवावी.
🔹 बेलापूर रेल्वे स्टेशनवर थांबा देऊन प्रवाशांना न्याय द्यावा.
🔹 अमृत भारत योजनेअंतर्गत बेलापूर स्टेशनवरील कामकाजाची गती वाढवावी.
🔹 साईनगर अहिल्यानगर–बीड कनेक्टिंग डेमू रेल्वे सेवा सुरु करावी.
या मागण्यांवर लवकरच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीषकुमार यांना निवेदन देऊन भेट घेण्यात येणार आहे. तसेच या संदर्भात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांतील खासदारांना निवेदने सादर करण्यात येतील.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिल्लीमध्ये या भेटीसाठी आवश्यक नियोजन आणि समन्वय करण्याचे आश्वासन दिले आहे.
बैठकीत डॉ. गोरख बारहाते, दत्तात्रय काशीद, भारत राऊत, विठ्ठलराव कर्डीले, किशोर फुणगे, भाऊसाहेब शिंदे, अनिता आहेर, वैभव गायकवाड, प्रकाश गदिया, किरण घोलप, बाळासाहेब गोराणे, रविंद्र शहाणे, सुजाता मालपाठक यांनी सक्रिय सहभाग घेतला व मौल्यवान सूचना दिल्या.
बैठकीचा समारोप करताना प्रकाश कुलथे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा