शीतल टाइम्स //- गावकरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अभिषेक खंडागळे यांची बिनविरोध निवड
शीतल टाइम्स प्रतिनिधी
![]() |
गावकरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अभिषेक खंडागळे यांची बिनविरोध निवड
बेलापूर (वार्ताहर)
बेलापूर येथील अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधणाऱ्या गावकरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अभिषेक खंडागळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माजी चेअरमन साहेबराव वाबळे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी सहायक निबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी आर. के. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची विशेष बैठक झाली.
या बैठकीस उपाध्यक्ष रामेश्वर सोमाणी, संचालक साहेबराव वाबळे, शरद नवले, जालिंदर कुऱ्हे, प्रफुल्ल डावरे, प्रविण बाठिया, जनार्दन ओहोळ, रावसाहेब अमोलिक, शशिकांत उंडे, संजय गोरे, रमेश काळे, सचिन वाघ, अजिज शेख, मोहसीन सय्यद, तस्वर बागवान तसेच संस्थेचे मॅनेजर संदीप लोखंडे उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रफुल्ल डावरे यांनी अभिषेक खंडागळे यांचे नाव चेअरमन पदासाठी सुचविले, तर त्या प्रस्तावास जनार्दन ओहोळ यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व संचालकांच्या एकमताने खंडागळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर अभिषेक खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रणजित श्रीगोड, हाजी इस्माईल शेख, मुस्ताक शेख, बंटी शेलार, शफिक बागवान, भाऊसाहेब तेलोरे, विशाल आंबेकर, महेश कुऱ्हे, गोपी दाणी, अली शेख, मुहाफिज शेख, प्रशांत मुंडलिक, अॅड. मयुर साळुंके, सुभाष शेलार, गयाज पठाण, आदित्य जाधव, सूरज बडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिषेक खंडागळे यांच्या निवडीबद्दल गावकरी पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी तसेच गावकरी मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
(शीतल टाइम्स – बेलापूर प्रतिनिधी)
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा