शीतल टाइम्स //- श्रीरामपुरात सम्राट बळीराजाची भव्य मिरवणूक बलीप्रतिपदेनिमित्त उत्साहाचा जल्लोष श्रीरामपूर (वार्ताहर)

       


शीतल टाइम्स प्रतिनिधी


श्रीरामपुरात सम्राट बळीराजाची भव्य मिरवणूक

बलीप्रतिपदेनिमित्त उत्साहाचा जल्लोष

श्रीरामपूर (वार्ताहर) 

बलीप्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजा सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आज शहरात सम्राट बळीराजाचे पूजन करून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय बळीराजा!”, “सम्राट बळीराजा अमर राहो!” अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले. मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने निघून आझाद मैदान येथे अभिवादन सभेने संपन्न झाली.

या वेळी भारतीय कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश मकासरे, विद्रोही सांस्कृतिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दिवे, भाकप (माले) पक्षाचे कॉ. जीवन सुरुडे, दत्तनगरचे माजी सरपंच पी. एस. निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले, संभाजी ब्रिगेडचे डॉ. अरविंद बडाख, शेतकरी संघटनेचे सुरेश टाके, विद्रोही संघटनेचे डॉ. सलीम शेख, तसेच आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे ज्ञानेश्वर भंगड यांनी आपल्या मनोगतांतून बळीराजाच्या न्यायनिष्ठ आणि समतेच्या विचारांचा गौरव केला.

मिरवणुकीत राजेश बोर्डे, सुधाकर बागुल, फ्रान्सिस शेळके, मुस्ताकभाई तांबोळी, अनिल गायकवाड, भागवत विधाटे, अरुण बर्डे, सुभान पटेल, राजू लोंढे, अमोल सोनवणे, राहुल दाभाडे, विक्रम कोरडेवाल, दिपक शेळके, संदीप राऊत, राहुल मेहत्रे, शाहीर भीमराव कदम, बाबासाहेब थोरात, सुरेश गवई, संतोष केदार, नारायण शेलार, सागर भिसे, अस्लम शेख, जीवन बोकफोडे, विलास शेळके, राजेश हिवाळे, दिलीप त्रिभुवन, उत्तमराव शेलार, सुनील वाघमारे, दत्तात्रय लबडे, किरण खंडागळे, रवी अण्णा गायकवाड, रवि बोर्डे, भारत शिंगे आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आझाद मैदानावरील अभिवादन सभेत सम्राट बळीराजाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला आणि कार्यक्रमाचा समारोप जल्लोषात झाला.







********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव