शीतल टाईम्स //- बेलापूरमध्ये गोविंददेवगिरी महाराजांच्या उपस्थितीत अन्नकोट उत्सव उत्साहात संपन्न
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूरमध्ये गोविंददेवगिरी महाराजांच्या उपस्थितीत अन्नकोट उत्सव उत्साहात संपन्न
बेलापूर (वार्ताहर)
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील श्री जुने बालाजी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नकोट उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज (किशोरजी व्यास) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
महाराजांच्या आगमनानंतर त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या आई जिजाऊ यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करीत होते, त्यामुळेच ते कधीही अपयशी ठरले नाहीत. आपणही जातिभेद विसरून ‘आपण सर्व हिंदू आहोत’ या भावनेने एकत्र राहिले पाहिजे.”
महाराज पुढे म्हणाले, “भारत माझा देश आहे, या प्रतिज्ञेचा अर्थ आपण या देशाचे मालक नाही, तर नागरिक आहोत. त्यामुळे भारतीय समाजासाठी असलेले कायदे आणि नियम यांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. माता-पित्यांची सेवा केल्याशिवाय चार धाम यात्रा करूनही काही उपयोग नाही. खरे पुण्य घरच्या पालकांच्या सेवेतच आहे.”
कार्यक्रमादरम्यान बेलापूरचे पत्रकार दिलीप दायमा यांचे सुपुत्र वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा सत्कार गोविंददेवगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आला. पुणे (आळंदी) येथे झालेल्या राष्ट्रीय वेदस्पर्धेत महेश यांनी देशभरातील ४३ गुरुकुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. महाराजांनी महेश यांचे कौतुक करत संवाद साधला. या प्रसंगी मिना दायमा, दिलीप दायमा व प्रेरणा दायमा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित महेश व्यास यांनी केले. पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्नकोट दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी शरद नवल मित्र मंडळ यांच्या वतीने गरीब व घिसाडी समाजातील नागरिकांना गोविंददेवगिरी महाराजांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार दिलीप दायमा, बाळासाहेब शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा