शीतल टाईम्स //- पुण्याच्या समिद्रा फाउंडेशनतर्फे बेलापूरला दिवाळी फराळ वाटप
शीतल टाइम्स प्रतिनिधी
पुण्याच्या समिद्रा फाउंडेशनतर्फे बेलापूरला दिवाळी फराळ वाटप
बेलापूर (वार्ताहर)
पुणे येथील समिद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने बेलापूर बु. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विविध समाजबांधवांना दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
उक्कलगाव येथील सदाशिव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली समिद्रा फाउंडेशन ही संस्था पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवते. दरवर्षी बेलापूर ग्रामपंचायतीमार्फत दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम या संस्थेच्या वतीने सातत्याने राबविला जातो.
यंदाही या उपक्रमात ग्रामपंचायत कर्मचारी तसेच घिसाडी समाज बांधवांना फराळाचे वाटप बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे, समिद्रा फाउंडेशनचे संचालक सदाशिव थोरात, श्वेता घोडके आणि बबनराव तागड यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, गावकरी पतसंस्थेचे चेअरमन अभिषेक खंडागळे, सरपंच मिनाताई साळवी तसेच ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांचे सहकार्य लाभले.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा