शीतल टाइम्स //- नवरात्र उत्सव कोजागिरीनिमित्त माता की चौकी कार्यक्रमाचे आयोजन

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी


नवरात्र उत्सव कोजागिरीनिमित्त 'माता की चौकी' कार्यक्रमाचे आयोजन

बेलापूर (वार्ताहर) 

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे जय मातादी मित्र मंडळ व शनेश्वर यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सव व कोजागिरी पौर्णिमा निमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता वाबळे मैदान येथे प्रसिद्ध भजनसम्राट बबलूजी दुग्गल सर यांचा ‘माता की चौकी (माता का जगराता)’ हा कार्यक्रम होणार आहे.

दुग्गल हे मातांचे जेष्ठ भक्त असून त्यांची भक्तिगीते मोठ्या सुरात व जोशात सादर होत असतात. भारतात तसेच परदेशातही त्यांचे भक्त मोठ्या संख्येने असून, जिथे जिथे त्यांचे कार्यक्रम होतात तिथे प्रचंड गर्दी होते. “चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है” सारखी त्यांची भक्तिगीते भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतात.

बबलूजी दुग्गल यांचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच भक्त मंडळी आपली जागा निश्चित करून ठेवत असल्याने या कार्यक्रमाला विशेष आकर्षण असते.

भाविक भक्तांनी या भक्तिसोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय मातादी मित्र मंडळ व श्री शनीश्वर यात्रा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव