शीतल टाइम्स //- बेलापूरमध्ये श्री शनि महाराज आश्रम स्थापनेचा प्रस्ताव ; भाविकांकडून उत्स्फूर्त समर्थन

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी


बेलापूरमध्ये श्री शनि महाराज आश्रम स्थापनेचा प्रस्ताव ; भाविकांकडून उत्स्फूर्त समर्थन

बेलापूर (वार्ताहर):

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील नवले वस्ती परिसरात श्री शनि महाराज मंदिर आश्रमासाठी दोन एकर जमीन घ्यावी, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे यांनी मांडला. त्यांच्या या सूचनेला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हिरवा कंदील दाखवला.

या वेळी उपस्थितांना संबोधित करताना आगे यांनी सांगितले की, “श्री शनि महाराज मंदिराचे हे स्थळ श्री हरी (भगवान विष्णू) व हर (भगवान महादेव) यांच्या पवित्र हरिहर केशव गोविंद भूमीवर आहे. त्यामुळे या ठिकाणाला आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या अपार महत्त्व आहे. येथे महंत दीपक वैष्णव यांनी निसर्गरम्य व निवांत परिसरात आश्रम स्थापन केल्यास ते शनिभक्तांसाठी आस्थेचे केंद्र ठरेल.”

या प्रस्तावाचे समर्थन करताना श्री शनिश्वर यात्रा कमिटीचे  अध्यक्ष रवींद्र खटोड यांनी मंदिरासाठी आवश्यक मार्बल बसवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले यांनी परिसरात सोलर स्ट्रीट लाईट्स बसविणे व अंडरग्राऊंड गटर व्यवस्था उभारणे यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच श्रीरामपूर तालुका भाजपचे जितेंद्र छाजेड यांनी श्री शनि मंदिरासाठी मुख्य गेट अर्पण केले.

स्थानिक भाविक नियमितपणे या प्राचीन श्री शनि महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. अंदाजे ४०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती असून परिसरात प्रवरा नदीकाठी भगवान हरिहर केशव गोविंद महादेवाचे ४०० वर्षे जुने मंदिर आहे. तसेच चारही दिशांना श्रीरामभक्त हनुमानांची मंदिरे आहे. हा परिसर धार्मिकतेने संपन्न असून शेकडो भाविक येथे श्रद्धेने देवदर्शनासाठी येतात.

बैठकीसाठी महंत दीपक वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद नवले, मनोज कुमार आगे, रवींद्र खटोड, सुभाष मोहिते, सचिन वाघ, पत्रकार दिलीप दायमा यांच्यासह अनेक भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव