शीतल टाइम्स //- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात अनुष्का शेलार एलएलएममध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या हस्ते गौरव
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभ
अनुष्का शेलार एलएलएममध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या हस्ते गौरव
शीतल टाइम्स न्यूज नेटवर्क
संभाजीनगर:
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र, संभाजीनगर (छत्रपती संभाजीनगर) येथे आयोजित पदवीदान समारंभात कुमारी अनुष्का बाबासाहेब शेलार हिस कायद्यातील सर्वोच्च पदवी 'एलएलएम' (Masters of Law) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरविण्यात आले. एलएलबी (LLB) नंतर त्यांनी नुकतीच ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली आहे.
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमार्फत आयोजित या प्रतिष्ठित समारंभात अनुष्का शेलार यांच्यासह इतर पदवीधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री. विक्रमनाथ, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश श्री. प्रसन्न वराळे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. देवेन्द्र कुमार चंद्रशेखर यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.
या समारंभास नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी महाराष्ट्रचे कुलपती (Chanceller) व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डॉ. ओक आणि कुलगुरू (Vice Chancellor) बिंदू रोनाल्ड यांच्यासह न्यायालयीन व कायद्याच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कर्नाटक हायकोर्टातील इंटर्नशिप पूर्ण
शैक्षणिक यशासोबतच कुमारी अनुष्का शेलार यांनी नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालय, बंगळूरु (बेंगलोर) येथे आपली इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्याची कन्या
कुमारी अनुष्का शेलार या सामाजिक, शैक्षणिक वाचन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, महाराष्ट्र शासनाचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार' प्राप्त आणि अहमदनगर जिल्हा ग्रंथालयाचे विश्वस्त प्रा. बाबासाहेब शेलार यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा