शीतल टाइम्स /- समाजासाठी विधायक काम करणाऱ्यांचाच सत्कार होतो - भास्कर खंडागळे

  

शीतल टाइम्स प्रतिनिधी


समाजासाठी विधायक काम करणाऱ्यांचाच सत्कार होतो - भास्कर खंडागळे

बेलापूर (प्रतिनिधी) 


सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव असून, अशा सत्कारांमुळे कार्य करण्यास नवी उर्जा मिळते, असे प्रतिपादन बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी केले. ते बेलापूर-ऐनतपूर येथील सत्यमेव जयते ग्रुपतर्फे आयोजित समाजसेवक सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, अभिषेक खंडागळे आणि भिमराज हुडे यांचा सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शेलार, पुणे येथील संतोष मोहोळ, डॉ. अविनाश डोंगरे, राहुल चांदिलकर आदींचाही सत्कार करण्यात आला.

तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “सत्यमेव जयते ग्रुप” सामाजिक बांधिलकी जपत विविध विधायक उपक्रम राबवत आहे. या ग्रुपमधील कार्यकर्त्यांनी गावाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला असून, त्यांचा सन्मान हा समाजातील प्रेरणादायी घटक ठरावा.”

सत्कारास उत्तर देताना पत्रकार देविदास देसाई म्हणाले, “सत्यमेव जयते ग्रुपमध्ये विविध विचारधारेचे कार्यकर्ते असूनही समाजहिताची जाणीव आणि उत्तरदायित्व या माध्यमातून जपले जाते. आमच्या कार्याची दखल घेत आयोजकांनी केलेला सत्कार ही मोठी प्रेरणा आहे.”

कार्यक्रमात भिमराज हुडे आणि संजय भोंडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. विष्णुपंत डावरे यांनी प्रास्ताविक केले, राजेंद्र कर्पे यांनी मानपत्र वाचन केले तर गोपी दाणी यांनी आभार मानले.

या प्रसंगी जालिंदर कुंहे, रणजित श्रीगोड, भाऊसाहेब कुताळ, संजय भोंडगे, गोरक्षनाथ कुंहे, चंद्रकांत नवले, पत्रकार नवनाथ कुताळ, सुनिल नवले, दिलिप दायमा, मुश्ताक शेख, रावसाहेब अमोलिक, दिपक काळे, भगिरथ मुंडलिक, महेश कुंहे, राधेश्याम अंबिलवादे, रविंद्र कर्पे, शफिक बागवान, पुंजाहरी सुपेकर, दादासाहेब कुताळ, शरद पुजारी, सोमनाथ जावरे, जाकीर शेख, प्रा. निजाम शेख, बाबासाहेब काळे, अरविंद हुडे, सचिन वाघ, विशाल आंबेकर, शफिक आतार, औंदुंबर राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव