शीतल टाइम्स //- लोकांच्या रांगा वाचनालयासमोर लागल्या तर देशाची प्रगती होईल - पत्रकार देविदास देसाई
शीतल टाइम्स प्रतिनिधी
लोकांच्या रांगा वाचनालयासमोर लागल्या तर देशाची प्रगती होईल - पत्रकार देविदास देसाई
बेलापूर (प्रतिनिधी):
“पुस्तक हे मन आणि मस्तक घडवते; आणि असे मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. नतमस्तक न झालेले मस्तक कुणाचेही हस्तक होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती कधीही विसरू नये,” असे विचार ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केले.
बेलापूर खुर्द येथील जागृती वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शन व वाचक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक म्हणून बोलताना देसाई म्हणाले, “वाचाल तरच वाचाल, कारण आजच्या युगात ज्ञान हीच खरी शक्ती आहे. हे ज्ञान मोबाईल वा सोशल मीडियावरून नाही, तर केवळ पुस्तकातून मिळते. म्हणूनच पुन्हा पुस्तकाकडे वळा, कारण सखोल ज्ञान आणि जीवनातले यश पुस्तकातूनच मिळते.”
या कार्यक्रमाचे संयोजक व जिल्हा ग्रंथालय संघाचे विश्वस्त प्रा. बाबासाहेब शेलार यांनी सांगितले की, ग्रामीण भागात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. “जत्रा ते साधना” अशा विनोद, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, पर्यटन, विद्यार्थी शिक्षण, विज्ञान अशा विविध विषयांवरील अनेक दिवाळी अंक प्रदर्शनात ठेवण्यात आले असून, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. राजेंद्र करपे यांनी वाचनाचे महत्त्व आणि दिवाळी अंकांमुळे मिळणारा आनंद यावर भाष्य करत बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. साहित्यिक कवी आलम शेख यांनी वाचनाचे जीवनातील स्थान स्पष्ट केले, तर बी. एम. पुजारी यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
पत्रकार सुहास शेलार यांनी वाचनालयास “रामनगरी शीतल टाईम्स” या दिवाळी अंकाची भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास पत्रकार अशोक शेलार, विलास भालेराव, कैलास वाकडे, प्रशांत होन, प्रभाकर क्षीरसागर, सोसायटीचे चेअरमन शशिकांत पुजारी, अनिल पुजारी, बाबा जोशी, रमेश बडदे, बाबुराव फुंदे, सुनील बडदे, मधुकर पुजारी, हुसेन पठाण, इरफान शेख, संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते विलास भालेराव यांनी केले.
वाचन संस्कृती पुन्हा रुजली, तरच समाज सशक्त होईल, हा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा