शीतल टाईम्स //- बेलापूरमध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन एक दिवा ग्रामदैवतासाठी, एक उजेड गावासाठी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूरमध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
एक दिवा ग्रामदैवतासाठी, एक उजेड गावासाठी
बेलापूर (वार्ताहर)
श्री हरिहर फाउंडेशन बेलापूर यांच्या वतीने दीपोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त "दीपोत्सव कार्यक्रमा"चे आयोजन करण्यात आले आहे. श्री हरिहर केशव गोविंद महाराज मंदिर येथे बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५.३० वा. हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना विनम्र आवाहन करण्यात आले आहे की, प्रत्येक भक्ताने आपल्या सोबत एक दिवा घेऊन या कार्यक्रमास उपस्थित राहावे. "एक दिवा ग्रामदैवतासाठी, एक उजेड गावासाठी, एक दिवा प्रवरा माईसाठी आणि एक दिवा जीवनदायिनीच्या कृतज्ञतेसाठी" या संदेशाने दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
श्री हरिहर फाउंडेशन बेलापूर यांच्या या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि अध्यात्मिकतेचा सुंदर संगम साधला जाईल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
✍️ शीतल टाईम्स वार्ताहर
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा