शीतल टाईम्स /- किशोर (उमेश) पवार, तालुका अध्यक्ष यांची मागणी: डिग्रस परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा
शीतल टाइम्स प्रतिनिधी किशोर (उमेश) पवार, तालुका अध्यक्ष यांची मागणी: डिग्रस परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा राहुरी- राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस आणि परिसरातील वस्ती भागांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी मोठी चिंता बनला आहे. गेल्या काही दिवसांत कॅनॉल रोड, गावडे वस्ती, वाघमारे वस्ती, दळे वस्ती, बेलेकर वस्ती व बेल्हेकर वस्ती या ठिकाणी बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांमुळे गायी, शेळ्या, कुत्रे यांसारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या असून, या भागांमध्ये दाट मानवी वस्ती असल्याने मानवी जीवितहानीचा धोका वाढला आहे, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत गौसे आजम सेवाभावी संस्थाचे संस्थापक अली सय्यद अध्यक्ष सुल्तान शेख याच्या मार्गदर्शन खाली महाराष्ट्र राज्य, राहुरी तालुका यांच्या वतीने तालुका अध्यक्ष किशोर (उमेश) पवार यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मा. वनरक्षक अधिकारी आणि वन परीक्षेत्र अधिकारी, राहुरी या...