शीतल टाईम्स //- प्रगतशील शेतकरी तुकाराम भाऊ देवकर यांचे दुःखद निधन

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी



प्रगतशील शेतकरी तुकाराम भाऊ देवकर यांचे दुःखद निधन  


खोसपुरी (ता. नगर) : येथील प्रगतशील शेतकरी व खोसपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तुकाराम (भाऊ) देवकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते.

देवकर यांनी आपल्या कार्यकाळात सोसायटीच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांचे शेतकी, सामाजिक तसेच संस्थात्मक कार्य गावात आदर्श मानले जाते.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सावित्रीबाई फुले विद्यालय, राहुरी विदयापीठ येथील उपाध्यापक प्रा. ज्ञानदेव देवकर हे त्यांचे सुपुत्र होत.

गावात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव