शीतल टाईम्स /- किशोर (उमेश) पवार, तालुका अध्यक्ष यांची मागणी: डिग्रस परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी



किशोर (उमेश) पवार, तालुका अध्यक्ष यांची मागणी: डिग्रस परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा


राहुरी-  राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस आणि परिसरातील वस्ती भागांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी मोठी चिंता बनला आहे. गेल्या काही दिवसांत कॅनॉल रोड, गावडे वस्ती, वाघमारे वस्ती, दळे वस्ती, बेलेकर वस्ती व बेल्हेकर वस्ती या ठिकाणी बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्यांमुळे गायी, शेळ्या, कुत्रे यांसारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या असून, या भागांमध्ये दाट मानवी वस्ती असल्याने मानवी जीवितहानीचा धोका वाढला आहे, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत गौसे आजम सेवाभावी संस्थाचे संस्थापक अली सय्यद अध्यक्ष सुल्तान शेख याच्या मार्गदर्शन खाली महाराष्ट्र राज्य, राहुरी तालुका यांच्या वतीने तालुका अध्यक्ष किशोर (उमेश) पवार यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाकडे निवेदन सादर करण्यात आले.

हे निवेदन मा. वनरक्षक अधिकारी आणि वन परीक्षेत्र अधिकारी, राहुरी यांच्या कडे देण्यात आले. निवेदन देताना अधिकारी लांबे साहेब, पाळंदे साहेब, तसेच स्थानिक नागरिक रविराज गावडे, उमेश पवार, प्रविण वाघमारे उपस्थित होते.

संस्थेने वनविभागास तातडीने सर्व आवश्यक उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची, तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलण्याची मागणी केली आहे.



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव