शीतल टाईम्स //- वेधमूर्ती महेश दायमा यांचा सन्मान ‘परिसवेध’ ग्रंथ वितरण सोहळ्यात मान्यवरांचा गौरव
शीतल टाइम्स प्रतिनिधी
वेधमूर्ती महेश दायमा यांचा सन्मान
‘परिसवेध’ ग्रंथ वितरण सोहळ्यात मान्यवरांचा गौरव
बेलापूर (प्रतिनिधी):
भारतातील सर्व वैदिक विद्यालयांमधून प्रथम श्रेणी मिळवणारे वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा सन्मान प्रधान आयुक्त विलास वसंतराव शिंदे व त्यांच्या परिवाराच्या वतीने नुकताच करण्यात आला.
प्रधान आयुक्त शिंदे आणि पुश फॉर फिलांथ्रोपिक अॅक्टिव्हिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त ‘परिसवेध’ या ग्रंथाचा वितरण सोहळा बेलापूर येथील सातभाई वस्ती येथे पार पडला. हा ग्रंथ महाराष्ट्र-गोवा राज्याचे वैचारिक प्रमुख रवींद्र (राजाभाऊ) मुळे यांनी लिहिला असून, त्याच कार्यक्रमात वेदमूर्ती दायमा यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पालक पत्रकार दिलीप दायमा व सौ. मीना दायमा यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात ज्योतिष तज्ज्ञ डॉ. प्रशांत लखोटिया व निशांत देवकर यांचाही गौरव झाला. तसेच बेलापूरचेच विलास शिंदे यांची प्रधान आयुक्तपदी झालेली नियुक्ती यानिमित्त त्यांचा पत्रकार देविदास देसाई, मारोतराव राशिनकर, दिलीप दायमा, विष्णुपंत डावरे आणि प्रा. ज्ञानेश्वर गवले यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मंचावर महानुभाव आश्रमाचे प्रमुख आनेराज बाबा शास्त्री, पंडित महेश व्यास, राजाभाऊ मुळे, तसेच भारतीय विचार साधना, पुणेचे अजय कात्रे उपस्थित होते.
संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश (नानासाहेब) जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “संघाने हाती घेतलेल्या *‘पंच परिवर्तन सूत्रा’*द्वारे समाज व राष्ट्रनिर्मितीचे कार्य अखंडपणे सुरू आहे. आदर्श समाज घडविण्याचे हे कार्य सातत्याने पुढे नेले जाईल.”
लेखक राजाभाऊ मुळे म्हणाले, “डॉ. हेडगेवार यांच्या हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अडचणींना न जुमानता प्रचंड त्याग व समर्पण केले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज परिवर्तनाचे फळ दिसत आहे. त्यांच्या योगदानाची पुढील पिढ्यांना जाणीव व्हावी म्हणूनच ‘परिसवेध’ हा ग्रंथ लिहिला आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप काळे, सौ. कल्याणीताई काळे, प्रेरणा दायमा, प्रा. गोरख बारहाते आणि दत्तात्रय काशीद यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर गवले यांनी केले, प्रास्ताविक प्रधान आयुक्त विलास शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन माजी सरपंच भरत साळुंके यांनी केले.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा